मालेगाव महानगरपालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ,ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Malegaon Mahanagarpalika Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -98 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वैद्यकीय अधिकारी | 36 |
| 02. | स्टाफ नर्स ( महिला ) | 28 |
| 03. | स्टाफ नर्स ( पुरुष ) | 04 |
| 04. | एमपीडब्ल्यु ( पुरुष ) | 30 |
| एकुण पदांची संख्या | 98 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे एमबीबीएस अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 व 03 साठी : उमेदवार हे जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.04 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे विज्ञान शाखेतुन इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच पॅरामेडिकल मुलभुत प्रशिक्षण कोर्स / स्वच्छता विषयकइन्स्पेक्टर अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग / NHM कर्मचारी करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे आरोग्य विभाग जुने सभागृह मालेगाव महानगरपालिका , मालेगाव या पत्यावर दिनांक 08 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 150/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026