महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मध्ये विविध गट क आणि ड पदांसाठी नियमित पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मध्ये विविध गट क आणि गट ड संवर्गातील पदांसाठी नियमित पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Maharashtra State Marathi Vishvakosh Recruitment For Class C & D Post ) सविस्तर पदभरती तपशिल पुढीलमाणे पाहुयात .

01.संपादकीय सहायक : संपादकीय सहायक पदांच्या 04 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे मराठी विषयातील पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच मराठी मधील संपादकीय अथवा संशोधन कार्याचा कामाचा 01 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणे आवश्यक असणार आहेत .

02.ग्रंथालयीन सहायक : ग्रंथालयीन सहायक पदांच्या 03 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमदेवार हे उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र तसेच ग्रंथालय शास्त्रातील पदवी तसेच ग्रंथालय संचालनालयाचे ग्रंथपालाचे प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

03.शिपाई : शिपाई पदांच्या 02 जागांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमदेवार हे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दि.21.12.2023 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/mrmvnmsep23/  या संकेतस्थळावर दिनांक 21.12.2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1,000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरा पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment