महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संवर्गातील तब्बल 823 पदांसाठी मुख्य परीक्षा 2022 करीता पदभरती प्रक्रिया राबविली जात आहे . सदर पदांकरीता पुर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्य उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B non Gazated Post ) पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
01. | दुय्यम निबंधक ( श्रेणी -1 ) मुद्रांक निरीक्षक ( गट ब ) | 78 |
02. | राज्य कर निरीक्षक ( गट ब ) | 93 |
03. | सहाय्यक कक्ष अधिकारी ( गट ब ) | 49 |
04. | पोलिस उपनिरीक्षक ( गट ब ) | 603 |
एकुण पदांची संख्या | 823 |
पात्रता : वरील पदांकरीता मुख्य परीक्षेसाठी पात्र पदवीधर उमेदवार आवेदन सादर करु शकतील , तसेच पोलिस उपनिरीक्षक या पदाकरीता उमेदवाराची उंची 165 से.मी तर छाती 79 सेमी व 5 सेमी फुगवता आली पाहीजे , तर महिला उमेदवारांकरीता उंची 157 सेमी असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : दिनांक 01.10.2022 रोजी – दुय्यम निबंधक या पदाकरीता 18 ते 38 वर्षे दरम्यान वय असणे आवश्यक आहे , राज्य कर निरीक्षक या पदाकरीता 19 ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहेत तर सहाय्यक कक्ष अधिकारी या पदांकरीता उमेदवाराचे वय 19 ते 31 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे व पोलिस उपनिरीक्षक या पदाकरीता 19 ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
आवेदन शुल्क : सदर पदभरती साठी खुला प्रवर्ग मधील उमेदवारांना 544/- रुपये तर मागास वर्गीय / आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग / अनाथ / दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांकरीता 344/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे दिनांक 18 ऑगस्ट 2023 पासून ते दि.01.09.2023 पर्यंत https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .
- NLC : नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 501 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , Apply Now !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , लगेच करा आवेदन !