महाराष्ट्र लोकसेवा आयेागमार्फत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . ( Maharashtra Public Service Commission Recruitment for Class A & B Post , Number of Post Vacacny – 378 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | वनक्षेत्रपाल गट ब | 13 |
02. | उप संचालक कृषी व इतर गट अ | 49 |
03. | तालुका कृषी अधिकारी गट अ | 100 |
04. | कृषी अधिकारी गट ब | 65 |
05. | सहाय्यक अभियंता , स्थापत्य गट ब | 102 |
06. | सहाय्यक अभियंता , विद्युत व यांत्रिकी गट ब | 49 |
एकुण पदांची संख्या | 378 |
पात्रता –
पद क्र.01 करीता विज्ञान शाखेतील पदवी / अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे / समतुल्य शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
पद क्र.02,03,04 करीता उमेदवार हा कृषी / कृषी अभियांत्रिकी / उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
पद क्र. 05,06 करीता उमेदवार हा अभियांत्रिकी पदवीधारक किंवा समतुल्या अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 38 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे , तर मागास वर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर दि.20 मार्च 2023 पर्यंत सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता 544/- आवेदन शुल्क आकारण्यात येईल , तर मागास वर्गीय / अनाथ / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांकरीता 344/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- कर्नाटक बँकेत पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1000+ जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AFCAT : भारतीय हवाई दल अंतर्गत फ्लाइंग , ग्राउंड ड्युटी करीता तब्बल 336 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 169 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 277 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !