MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत राजपत्रित संवर्ग अ & ब पदांसाठी मोठी महाभरती 2023 ! Apply Now !

Spread the love

महाराष्ट्र लोकसेवा आयेागमार्फत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . ( Maharashtra Public Service Commission Recruitment for Class A & B Post , Number of Post Vacacny – 378 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वनक्षेत्रपाल गट ब13
02.उप संचालक कृषी व इतर गट अ49
03.तालुका कृषी अधिकारी गट अ100
04.कृषी अधिकारी गट ब65
05.सहाय्यक अभियंता , स्थापत्य गट ब102
06.सहाय्यक अभियंता , विद्युत व यांत्रिकी गट ब49
 एकुण पदांची संख्या378

पात्रता –

पद क्र.01 करीता विज्ञान शाखेतील पदवी / अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे / समतुल्य शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

पद क्र.02,03,04 करीता उमेदवार हा कृषी / कृषी अभियांत्रिकी / उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

पद क्र. 05,06 करीता उमेदवार हा अभियांत्रिकी पदवीधारक किंवा समतुल्या अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 38 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे , तर मागास वर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://mpsconline.gov.in/candidate  या संकेतस्थळावर दि.20 मार्च 2023 पर्यंत सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता 544/- आवेदन शुल्क आकारण्यात येईल , तर मागास वर्गीय / अनाथ / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांकरीता 344/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment