MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत पोलिस उपनिरीक्षक ( PSI ) पदांच्या तब्बल 615 जागांसाठी महाभरती , Apply Now !

Spread the love

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत पोलिस उपनिरीक्षक ( PSI ) पदांच्या तब्बल 615 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Public Service Commission Recruitment For Police Sub Inspector Post , Number Of Post Vacancy – 615 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : पोलिस उपनिरीक्षक या पदांच्या तब्बल 615 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

पात्रता : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी + 04 वर्षे नियमित सेवा किंवा 12 वी  + 05 वर्षे नियमित सेवा किंवा 10 वी पास + 06 वर्षे सेवा ( गृह विभागांमध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षक , पोलिस , हवालदार , पोलिस नाईक , पोलिस शिपाई यापैकी एका पदांवर नियमित सेवा  )

वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 03 ऑक्टोंबर 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागस प्रवर्गाकरीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .

हे पण वाचा : अधिकारी , परिचारिका , लिपिक , परिचर , मदतनिस पदांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर दिनांक 03.10.2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 544/- रुपये आवेदन शुल्क तर मागास प्रवर्ग / आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग / अनाथ / दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 344/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment