टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये अधिकारी , परिचारिका , लिपिक , परिचर , मदतनिस अशा विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Tata Memorial Center Mumbai Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 71 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : सहायक प्रशासकीय अधिकारी पदांच्या 11 जागा , सहायक लेखाधिकारी पदांच्या 02 जागा , वैज्ञानिक सहाय्यक ( क ) पदांच्या 01 जागा , परिचारिका ( ए) पदांच्या 11 जागा , वैज्ञानिक सहाय्यक ब पदांच्या 06 जागा , फार्मासिस्ट पदांच्या 01 जागा , तंत्रज्ञ सी पदांच्या 01 जागा , तंत्रज्ञ अ पदांच्या 04 जागा , निम्न विभाग लिपिक पदांच्या 02 जागा , स्वयंपाकी पदांच्या 01 जागा , परिचर पदांच्या 04 जागा , व्यापार मदतनिस पदांच्या 18 जागा अशा एकुण 71 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक पात्रता : यांमध्ये प्रशासकीय अधिकारी / लेखाधिकारी पदांकरीता पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तर वैज्ञानिक सहाय्यक पदाकरीता बी.एस्सी संबंधित विषयांमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तर परिचारिका पदाकरीता नर्सिंग तर तंत्रज्ञ पदांकरीता इलेक्ट्रीशियन मध्ये पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तर लिपिक पदाकरीता पदवी तर स्वयंपाकी / परिचर / मदतनिस पदांकरीता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://tmc.gov.in/m_events/Events/JobVacancies या संकेतस्थळावर दिनांक 22 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 300/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग / महिला / माजी सैनिक उमेदवारांकरीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RITES : रेल इंडिया तांत्रिक व इकॉनिमिक सेवा लि.मध्ये विविध पदांच्या 257 जागांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- राज्यातील सर्वच जिल्ह्यात विधी व न्याय विभाग मध्ये 5,793 जागेसाठी महाभरती , अर्ज करण्यास सुरुवात !
- GTDC : गोवा पर्यटन विकास महामंडळ मध्ये पदभरती 2023 , लगेच करा आवेदन ! लगेच करा आवेदन !
- MPCB : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
- मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय मुंबई येथे विविध पदांच्या 144 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !