12 वी उत्तीर्ण असाल तर तब्बल 7,547 जागांसाठी सरकारी नोकरची मोठी उत्तम संधी , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

आपण जर इयत्ता 12 वी उत्तीर्ण असाल तर , तब्बल 7 हजार 547 जागांसाठी सरकारी नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . तर अशा 12 वी पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे विहीत काळांमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत . ( Delhi Police Recruitment For Police Constable Post , Number of Post Vacancy – 7,547 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम : यांमध्ये कॉन्स्टेबल ( एक्झिक्युटिव –  पुरुष ) पदांच्या 4,453 जागा , कॉन्स्टेबल ( एक्झिक्युटिव – पुरुष माजी सैनिक  ) पदांच्या 266 जागा , कॉन्स्टेबल ( एक्झिक्युटिव – पुरुष ) पदांच्या 337 जागा , तर कॉन्स्टेबल ( एक्झिक्युटिव – महिला ) पदांच्या 2,491 जागा अशा एकुण 7,547 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

हे पण वाचा : खादी व ग्रामोद्योग आयोग मध्ये पदभरती प्रक्रीया , लगेच करा आवेदन

शैक्षणिक पात्रता / वयोमर्यादा :  वरील सर्व पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत , तसेच उमेदवाराचे दिनांक 01 जुलै 2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये SC / ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे वयामध्ये सुट तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी मध्ये पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क :  जाहीरातीमध्ये नमुद अर्हता असणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.nic.in/ या वेबसाईट वर ऑनलाइन पद्धतीने दिनांक 30.09.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर भरती करीता उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने 100/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक / महिला प्रवर्गातील उमेदवारांकरीता फीस आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा / अर्ज करा

Leave a Comment