महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये चालक -वाहक व लिपिक पदांच्या तब्बल 13,670 जागांसाठी पदभरती प्रक्रिया करण्यात येणार आहेत . कोरोना महामारीनंतर राज्य परिवहन महामंडळमध्ये कोणत्याही प्रकारची पद भरती प्रक्रिया करण्यात आलेली नाही . यामुळे रिक्त पदांचे संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे , रिक्त पदांवर कंत्राटी पद्धतीने चालक भरण्यात आलेले आहेत .परंतु वाहक हे पद जबाबदारची पद असल्याने , कंत्राटी / रोजंदारी तत्वावर भरता येत नाहीत .
सध्या बस महामंडळ मध्ये 13,670 पदे रिक्त आहेत यामध्ये वाहक , चालक व कनिष्ठ लिपिक पदे रिक्त आहेत .सदर रिक्त पदांवर पदभरती करण्यासाठी नविन आकृतीबंध तयार करण्यात येणार आहे , सुधारित आकृतीबंध तयार झाल्यानंतर पदभरती प्रक्रिया करण्यात येणार आहे . सध्या राज्य शासनांकडून महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना मोर्फत प्रवास सुरु असल्याने , महिला व ज्येष्ठ नागरीक मोठ्या प्रमाणात प्रवासासाठी बसचा वापर करताना दिसून येत आहेत .
यामुळे मागील काही दिवसांमध्ये महामंडळाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत आहे . तर दुसरीकडे महामंडळाकडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने , अनेक कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम काम दिला जात आहेत . यामुळे रिक्त पदांवर लवकरात लवकर पदभरती प्रक्रिया करण्याची मागणी देखिल कर्मचारी युनियन कडून करण्यात येत आहेत .
बस महामंडळ मधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे पदे आता व्यपगत करण्यात आलेले आहेत , यामध्ये हमाल , सफाईगार , शिपाई इत्यादी पदे आता महामंडळाकडून रद्द करण्यात आलेले असून सदरचे काम आता बाह्यस्त्रोताद्वारे करुन घेतली जात आहेत .महामंडळातील वाहक – चालक व लिपिक पदांच्या पदभरती प्रक्रिया बाबत सविस्तर अधिक माहितीसाठी खाालील सविस्तर जाहीरात पाहा !
- साधू वासवानी गुरुकुल पुणे अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , कला / संगणक शिक्षक , लिपिक इ. पदांसाठी पदभरती !
- बॉम्बे मर्कंटाईल सहकारी बँक लि. अंतर्गत विविध पदांच्या 135 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- राज्यातील शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती !
- सुमित्रा मल्टीस्टेट सहकारी सोसायटी लि.सोलापुर अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग , पुणे अंतर्गत 219 जागेसाठी महाभरती , Apply Now !