MSRTC : बस महामंडळ मध्ये सरळसेवा पद्धतीने चालक , वाहक व लिपिक पदांच्या 13,670 जागेसाठी महाभरती ! सविस्तर पात्रता , भरती वेळापत्रक पाहा !

Spread the love

MSRTC Recruitment : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये , चालक – वाहक व लिपिक पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया सरळसेवा पद्धतीने राबविण्यात येणार आहेत . महामंडळमध्ये सध्या रिक्त पदांची आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने , वाहक – चालक व लिपिक पदांवर पारदर्शक पद्धतीने पदभरती करण्यात येणार आहे , जेणेकरुना राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरीची मोठी सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे .सुधारित पदभरती भरती प्रक्रियाप्रमाणे पदांनुसार आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे पाहुयात ..

चालक व वाहक पदांकरीता आवश्यक पात्रता – सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता दहावी ( SSC ) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .  तसेच उमेदवारांस उत्तम मराठी भाषा बोलता तसेच लिहीता येणे आवश्यक असणार आहे .तसेच उमेदवार हा प्रादेशिक परिवहन ( RTO ) यांच्याकडुन अवजड वाहन चालविण्याचा वैध परवाना व बिल्ला ( PSV Batch ) असणे आवश्यक असणार आहे .

तसेच आपल्या प्रादेशिक परीवहन कार्यालय यांच्याकडील वाहकाचा वेध परवाना व बॅच बिल्ला नियुक्ती होण्यापुर्वी सादर करणे आवश्यक असणार आहे .त्याचबरोबर उमेदवाराची किमान उंची ही 160 से.मी तर कमाल उंची ही 180 से.मी पर्यंत असणे आवश्यक असणार आहे . तसेच उमदेवाराची दृष्टी ही चष्म्याशिवाय 6X6 ( चष्म्याविरहीत दृष्टी ) असणे आवश्यक आहे .तर रातांधळेपणा दोष असणारे उमेदवार अपात्र ठरणार आहेत .

हे पण वाचा : शिक्षक – शिक्षकेत्तर पदांसाठी महाभरती 2023 !

कनिष्ठ लिपिक – कनिष्ठ लिपिक या पदांकरीता उमेदवार हे इयत्ता बारावी ( HSC ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , त्याचबरोबर मराठी 30 श.प्र.मि टायपिंग तर इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

वयोमर्यादा – उमेदवाराचे जाहीरात प्रसिद्ध झाल्यापासून किमान वय हे 24 वर्षांपेक्षा कमी नसावे , तर कमाल वयोमर्यादा ही 38 वर्षांपेक्षा अधिक नसावी यांमध्ये कोरोना महामारीमुळे दोन वर्षांची शिथिलता देण्यात येईल , तर मागास वर्गीय / माजी सैनिक यांना नियमांप्रमाणे वयांमध्ये शिथिलता देण्यात येईल .

Leave a Comment