आयडीबीआय बँकेमध्ये तब्बल 1036 पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , आवेदन मागविण्यात येत आहेत .( Industrial Development Bank Of India Recruitment For Executives Post , Number of Post Vacancy – 1036 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम व पदसंख्या – यांमध्ये एक्झिक्युटिव पदांच्या तब्बल 1036 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , यांमध्ये खुला प्रवर्गातील उमेदवारांकरीता 451 पदे , अनुसुचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरीता 160 जागा , अनुसुचित जाती प्रवर्गातील उमेदवारांकरीता 67 जागा तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता 255 जागा , तर आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता 103 जागा राखीव ठेवण्यात आलेले आहेत .
पात्रता / वयोमर्यादा – सदर पदांकरीता उमदेवार हा 55 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . यांमध्ये अनुसुचित जाती / अनुसुचित जमाती व विकलांग उमेदवारांकरीता 5% सुट म्हणजेच 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . ( Recruitment For Executives Post , any Graduate Student are Eligible for apply this Post . ) सदर पदांकरीता दि.01 मे 2023 रोजी उमेदवाराचे किमान वय 20 वर्षे तर 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे , यामध्ये मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : 10 वि पात्रता धारकांसाठी तब्बल 1646 जागांसाठी मेगाभर्ती 2023 ! Apply Now !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज https://ibpsonline.ibps.in/idbiemar23/ या संकेतस्थळावर दि .07 जुन 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करावे लागेल . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता 200/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026