महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये बऱ्याच दिवसांपासुन भरती प्रक्रिया झालेली नाही . महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप बरेच दिवस चालल्याने , महामंडळाला आर्थिक तोटा सहन करावा लागला होता . परंतु आता महामंडळाची आर्थिक स्थिती रुळावर आलेली असुन , मोठ्या प्रमाणात रिक्त पदे झालेले आहेत . शिवाय संप काळामध्ये अनेकांना निलंबित केल्याने रिक्त पदांची संख्या मोठी आहे . त्याचबरोबर मागील 3 वर्षामध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर पदभरती झालेली नसल्याने महामंडळाच्या कामकाजासाठी कर्मचाऱ्यांवर ताण निर्माण होत आहे .
संप काळामध्ये निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना परत कामावर न घेतल्याने शिवाय निलंबित कर्मचाऱ्यांना वारंवार नोटीसा देवूनही कर्मचारी कामावर हजर न झाल्याने अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्ती आदेशही महामंडळाकडुन देण्यात आलेले आहेत .यामुळे महामंडळाला मनुष्यबळाचा तुटवटा निर्माण होत आहे .संप कालावधी मध्ये निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्या आठ हजारापेक्षा जास्त होती , यापैकी अनेकांनी परत कामावर हजर झाले तर अनेकजण कामावर हजरच झाले नाहीत .अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्यात आलेल्या आहेत .अशा कर्मचाऱ्यांची संख्या 5000 आहे .यामुळे सदर जागा रिक्त झालेल्या आहेत .या रिक्त पदांवर महामंडळाकडुन काही कर्मचारी कंत्राटी तत्वावर भरण्यात आलेले आहेत .
या पदांसाठी होणार महाभरती –
प्रामुख्याने वाहक , चालक पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत . वाहक व चालकांचे सुमारे 20,000 पदे रिक्त आहेत . तर लिपिक पदांच्या 2000 जागा रिक्त आहेत . त्याचबरोबर हमाल , वाहक निरीक्षक ,स्वच्छता कर्मचारी , शिपाई तसेच बहुउद्देशिय कर्मचारी पदांचे पदे रिक्त आहेत . या रिक्त पदांवर लवकरच महाभरती आयोजित करण्यात येणार आहेत . यापैकी काही पदे हे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत , तर उर्वरित पदे कायमस्वरुपी तत्वावर भरण्यात येणार आहेत . 20,000 जागांपैकी 11,000 जागांवर महाभरती महामंडळाकडुन लवकरच आयोजित करण्यात येणार आहे .
- माध्यमिक विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- राज्य शासन सेवेत वर्ग – 4 ( परिचर , शिपाई , मदतनीस इ.) पदांच्या नियमित पदावर मोठी पदभरती..
- Mahanirmiti : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत 800 पदांसाठी महाभरती ; अर्ज करण्यास विसरु नका ..
- कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुल अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती ; अर्ज करायल विसरु नका .