राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत इयत्ता 12 वी उत्तीर्ण उमेदवारांकरीता मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Defence academy & Naval Academy Recruitment , Number of Post Vacancy – 404 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | NDA – भूदल | 208 |
| 02. | NDA – नौदल | 42 |
| 03. | NDA – हवाई दल | 120 |
| 04. | NA – नौदल | 34 |
| एकुण पदांची संख्या | 404 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतुन भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र व गणित विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचा जन्म हा दिनांक 02 जानेवारी 2006 ते दिनांक 01 जानेवारी 2009 या कालावधीमध्ये झाला असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php या संकेतस्थळावर दिनांक 04 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर SC / ST / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026