NPCIL : न्युक्लियर पावर कॉर्पोरेश ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 400 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 400 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nuclear Power Corporation of India Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 400 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मेकॅनिकल150
02.केमिकल73
03.इलेक्ट्रिकल69
04.इलेक्ट्रॉनिक्स29
05.इंस्ट्रुमेंटेशन19
06.सिव्हिल60
 एकुण पदांची संख्या400

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमदेवार हे 60 टक्के गुणांसह संबंधित विषयांमध्ये बी ई / बी टेक / बी. एस्सी ( इंजिनिअरिंग ) / एम.टेक अर्हता , गेट परीक्षा 2022 / 2023 / 2024 अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : भारतीय रेल्वे विभाग मध्ये 1,113 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 30.04.2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 26 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे  https://www.npcilcareers.co.in या संकेतस्थळावर दिनांक 30.04.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 500/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment