ऑर्डनन्स फॅक्टरी देहु रोड पुणे येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ordance Factory Dehu Road Pune Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 105 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| पदनाम | डिप्लोमा अप्रेंटिस संख्या | पदवीधर अप्रेंटिस संख्या |
| मेकॅनिकल | 10 | 09 |
| जनरल स्ट्रीम पदवीधर | 0 | 50 |
| माहिती तंत्रज्ञान | 01 | 03 |
| इलेक्ट्रिकल | 01 | 05 |
| केमिकल | 15 | 10 |
| एकुण पदसंख्या | 27 | 77 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : यांमध्ये पदवीधर अप्रेंटिस पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातुन संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग / टेक्नोलॉजी पदवी किंवा जनरल स्ट्रीम पदवीधर असणे आवश्यक असणार आहेत .तर डिप्लोमा अप्रेंटिस पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयात इंजिनिअरिंग / टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Sr General Manager , Ordnance Factory Dehu Road , District Pune Maharashtra 412101 या पत्यावर आवेदन 21 दिवसांच्या आत सादर करायचे आहेत , सदर पदभरती करीता परीक्षा / आवेदन शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !