PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखले जाते . सदर पालिकेमध्ये रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वर्ग क व वर्ग ड संवर्गातील तब्बल 9785 जागेसाठी पद भरती जाहिरातीची नोटिफिकेशन पालिका प्रशासनाकडून निर्गमित करण्यात आलेली आहे .
यापैकी संवर्ग क मध्ये सर्वात जास्त रिक्त पदांची संख्या 4720 असून , वर्ग ड मध्ये 4413 जागा रिक्त आहेत .त्याचबरोबर संवर्ग अ मध्ये 313 जागा त्याचबरोबर संवर्ग ब मध्ये 339 जागा रिक्त आहेत . सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एकूण 16838 जागा मंजूर असून यापैकी 9685 जागा रिक्त आहेत तर 7053 जागा भरलेली आहेत . रिक्त पदावर तात्काळ भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत .
राज्य शासनाकडून दिलेल्या सूचनेनुसार येत्या 15 मे 2023 पर्यंत राज्यातील महानगरपालिका / नगरपरिषदा आस्थापनेवरील रिक्त पदावर भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . त्याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून रिक्त पदांच्या 9785 जागेसाठी नोटिफिकेशन जाहिरात निर्गमित करण्यात आलेली आहे .
यामध्ये संवर्ग क मध्ये लिपिक टंकलेखक पदांच्या 1000 पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत . त्याचबरोबर संवर्ग ड मध्ये शिपाई/ परिचर पदांच्या 2320 जागा रिक्त आहेत .सदर पद भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार असून , राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची उत्तम संधी प्राप्त होणार आहे .
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .