पिंपरी चिंचवड महानगर पालिकेमध्ये फक्त इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( PCMC municipal Corporation Recruitment , number of Post Vacancy – 154 )
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ऍण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान या कार्यक्रमासाठी आशा स्वयंसेवकिा पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
यामध्ये आशा स्वयंसेविका पदांच्या 154 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदभरती ही महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या असून , विवाहीत उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहेत . सदर पदांकरीता महिला उमेदवाराचे किमान शिक्षण इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तर उच्च शिक्षित महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे .
वयोमर्यादा – सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 20 वर्षे तर कमाल वय 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .
कामाचे स्वरुप – आशा स्वयंसेविकांनी महानगरपालिकाच्या रुग्णालय / दवाखाना कार्यक्षेत्रात रुग्णांना शासनाकडील निर्देशांकानुसार संदर्भ सेवा पुरवावे लागतील . कामाच्या स्वरूप यानुसार मोबदला अदा करण्यात येईल !
अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज संबंधित रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रानुसार संबंधित रुग्णालयांमध्येच अर्ज मिळतील व त्याच ठिकाणी अर्ज सादर करावे लागतील , अर्ज सादर करावयाचे ठिकाणाच्या सविस्तर माहितीसाठी खालील जाहीरात पाहा .अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 04 मे 2023 असणार आहे .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026