डेक्कन शैक्षणिक संस्था पुणे येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक पात्रताधारक उमदेवारांकडून विहीत कालावधीत ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भात सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये कार्यालय सहाय्यक ,प्रयोगशाळा सहाय्यक , ग्रंथालय सहाय्यक , कनिष्ठ पर्यवेक्षक ( स्थावर ) , लिपकि , चतुर्थ श्रेणी कर्मचारी ( यांमध्ये शिपाई , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथालय परिचर ) प्रशासकीय अधिकारी डीजीटल मार्केटिंग अधिकारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .पदांनुसार आवश्यक पात्रता खालील प्रमाणे आहेत .
कार्यालय सहाय्यक – कार्यालय सहाय्यक पदांकरीता उमेदवार हा पदवीधर असणे आवश्यक आहे तसेच एमएससीआयटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , यांमध्ये वित्त लेखा विभागातील कार्यालय सहाय्यक पदांकरीता उमेदवार हा वाणिज्य शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच MSCIT , TALLY प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
प्रयोगशाळा सहाय्यक / ग्रंथालय सहाय्यक – प्रयोगशाळा सहाय्यक पदांरकीता उमेदवार हा बी.एस्सी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर ग्रंथालय सहाय्यक पदांकरीता उमेदवार हा बी.लिब / एम.लिब उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
कनिष्ठ पर्यवेक्षक / प्रशासकीय अधिकारी / डिजिटल मार्केटिंग अधिकारी – कनिष्ठ पर्यवेक्षक या पदांकरीता उमेदवार हा स्थापत्य पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर प्रशासकीय अधिकारी या पदांकरीता उमेदवार हा पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच MSCIT प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर डिजिटल मार्केटिंग या पदांकरीता उमेदवार हा पदवी / पदव्युत्तर पदवी सोबत डिजीटल मार्केटिंग प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
चतुर्थश्रणी कर्मचारी – चतुर्थश्रेणी कर्मचारीमध्ये शिपाई ,प्रयोगशाळा परिचर , शिपाई या पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून या पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 9 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !