महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागांमध्ये , जिल्हानिहाय रिक्त पदांवर महाभरती जाहीरात प्रसिद्ध ! Apply Now Online !

Spread the love

राज्य शासनांच्या कृषी विभागांमध्ये जिल्हानिहाय रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया जाहीरात प्रसिद्ध झालेली असून , राज्यातील कृषी विभागनिहाय रिक्त पदांचे आकडेवारी जाहीरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत .सदर पदांसाठी आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून दि.30 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .

यांमध्ये राज्यातील सर्व कृषी विभांमध्ये वरिष्ठ लिपिक व सहाय्यक अधिक्षक  पदांचे रिक्त जागांचे विवरण पुढीलप्रमाणे आहे .

हे पण वाचा : मुंबई येथे 4000+ पदांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी !

विभागाचे नाववरिष्ठ लिपिकसहाय्यक अधिक्षक
छत्रपती संभाजी नगर1104
पुणे1305
ठाणे1808
नाशिक1206
कोल्हापुर1404
नागपुर1410
अमरावती0910
लातुर1406
 10553

पात्रता – वरिष्ठ लिपिक या पदांकरीता उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवी धारण केलेली असावी तर सहाय्यक अधिक्षक या पदाकरीता उमेदवार हा किमान द्वितीय श्रेणीतील पदवीधारक असणे आवश्यक आहे . तसेच उमेदवारांचे वय दि.31.03.2023 रोजी 18 ते 40 वर्षांदरम्याने असणे आवश्यक आहेत तर यांमध्ये मागास प्रवर्गाकरीता वयांमध्ये पाच वर्षांची सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : पदवी / 12 वि / 10 वि पात्रता धारकांसाठी सरकारी नोकरीची मोठी सुवर्णसंधी !

अर्ज प्रक्रिया – सदर जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://ibpsonline.ibps.in/campmar23/ या संकेतस्थळावर दि.30.04.2023 पर्यंत अर्ज सादर करायची आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता 720/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर मागास प्रवर्ग , आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग  / दिव्यांग / अनाथ / माजी सैनिक प्रवर्गातील उमदेवारांकरीता 650/- रुपये आवदेन शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment