ZP : जिल्हा परिषद पुणे मध्ये 1,008 जागांसाठी मेगाभरती , सविस्तर जाहीरात पाहा !

Spread the love

जिल्हा परिषद पुणे येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी तब्बल 1,008 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . सदर पदांसाठी पुढील महिन्यांपासून अर्ज सादर करण्याची सुरुवात होत आहे .( ZP Pune Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 1,008 ) पदभरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहुयात ..

जिल्हा परिषद कर्मचारी संवर्गामध्ये लिपिक , वरीष्ठ लिपिक , शिक्षक , कनिष्ठ सहाय्यक , विस्तार अधिकारी , शिपाई , परिचर , प्रयोगशाळा सहाय्यक , डॉक्टर , नर्स इ. गट क व ड संवर्गातील रिक्त पदांच्या एकुण 1 हजार 8 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . याबाबत पुणे जिल्हा परिषद प्रशासनांकडून रिक्त पदांवर पुढील महिन्यात पदभरती करणेबाबत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेली आहे .

IBPS मार्फत होणार निवड : राज्यांमध्ये सध्या नोकर पदभरती मध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आयबीपीएस एजन्सी मार्फत परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहेत . यामुळे सध्या तलाठी , वनरक्षक पदांची पदभरती प्रक्रिया सुरु असल्याने पुढील महिन्यात राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमध्ये मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत .

हे पण वाचा : सरळसेवा महाभरती : महाराष्ट्र कृषी विभागांमध्ये तब्बल 1757 रिक्त पदांवर मोठी महाभरती प्रक्रिया 2023

जरी जिल्हानिहाय पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात येत असली तरी , राज्यांमध्ये जिल्हा परिषदांच्या परीक्षा एकाच वेळी घेण्यात येणार आहेत . उमेदवारांची संख्या अधिक झाल्यास , वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहेत .

Leave a Comment