जिल्हा परिषद रायगड मध्ये एकूण 1,208 जागेसाठी मेगा भरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

जिल्हा परिषद रायगड अंतर्गत शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकांच्या मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्यासंदर्भात राज्य शासनाच्या निर्णयानुसार तब्बल बाराशे आठ जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबवली जात असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत ..

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडील दिनांक 07जुलै 2023 नुसार पवित्र प्रणालीमध्ये नियमित शिक्षक भरती मधून शिक्षक भरती होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळातील सेवानिवृत्ती शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद शाळा मधील रिक्त पदावर कंत्राटी तत्वावर पद भरती प्रक्रिया राबवली जात आहे ..

रायगड जिल्ह्यातील एकूण 15 तालुक्यातील मराठी माध्यम करिता एकूण 1104 तर उर्दू माध्यम करिता 104 अशा एकूण बाराशे आठ कंत्राटी शिक्षकांची पदभरती प्रक्रिया राबवली जात आहे ..

हे पण वाचा : BMC NEW भरती : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध पदांकरिता , आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया !

कंत्राटी शिक्षक पदाकरिता उमेदवार हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील अथवा खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळातील सेवानिवृत्ती शिक्षक असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्षापेक्षा अधिक असू नये तसेच सदर निवड झालेल्या उमेदवारास एकत्रित 20,000/- रुपये मासिक मानधन अदा करण्यात येईल त्या व्यतिरिक्त कोणतेही लाभ अदा करण्यात येणार नाहीत ..

अर्ज प्रक्रिया : जाहिरातीमध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन शिक्षणाधिकारी प्राथमिक रायगड जिल्हा परिषद अलिबाग तिसरा मजला अलिबाग पंचायत समिती कार्यालयाची इमारत मुख्य पोस्ट ऑफिस समोर अलिबाग रायगड 40 22 01 या पत्त्यावर दिनांक 28 जुलै 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत ..

या संदर्भातील कंत्राटी शिक्षकांची मेगा भरती संदर्भातील सविस्तर मेगा भरती जाहिरात खालील प्रमाणे पाहू शकता ..

Leave a Comment