Reliance Scholarship :  12 वी मध्ये 60% गुणांसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रिलायन्स फांऊडेशनची 2 लाख रुपये शिष्यवृत्ती ! अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

Reliance Scholarship 2023-24 : रिलायन्स फाउंडेशन मार्फत इयत्ता 12 वी मध्ये 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तब्बल 2 लाख रुपयांची शिष्यवृत्ती पुढील शिक्षणासाठी देण्यात येते , याकरीता रिलायन्स फाउंडेशनकडून ऑनलाईन पद्धतीने 12 मध्ये 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाकडून आवेदन मागविण्यात येत आहेत .

शिष्‍यवृत्ती योजनासाठी आवश्यक पात्रता :

अर्जदार हा मुळ भारतीय नागरीक असणे आवश्यक असणार आहे , तसेच अर्जदाराराने इयत्ता 12 वी मध्ये 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे , व सदर अर्जदाराचा प्रवेश पदवी / डिप्लोमासाठी असणे आवश्यक असणार आहे .तसेच अर्जदाराच्या पालकाचे मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न हे 15 लाखांपेक्षा कमी असावेत , यांमध्ये 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या अर्जदारांस प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे .

किंवा अर्जदाराने 10 वी नंतर डिप्लोमा केला असेल असे अर्जदार देखिल या शिष्यवृत्‍तीसाठी पात्र ठरणार आहेत . तसेच अर्जदार 12 वी / डिप्लोमा नंतर पदवी साठी ऑनलाईन , नियमित , अनियमित पद्धतीने प्रवेश घेतले असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : आदित्य बिर्ला कंपनीची पहीली ते पदवी पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांना 18,000/- रुपये ते 60,000/- रुपये पर्यंत शिष्यवृत्ती योजना !

शिष्यवृत्ती आर्थिक लाभ : पात्र अर्जदार विद्यार्थ्यांस पुढील शिक्षणांसाठी ( पदवी शिक्षणादरम्यान ) 2 लाख रुपये शिष्यवृत्ती म्हणून आर्थिक लाभ देण्यात येते .

आवश्यक कागतपत्रे : आवेदन सादर करण्यासाठी अर्जदारांस पुढील कागतपत्रे आवश्यक असणार आहेत , यादी पुढीलप्रमाणे आहे ..

01.पासपोर्ट साईज फोटो

02.रहिवासी दाखला

03.दहावी / बारावी गुणपत्रक

04.चालु शैक्षणिक वर्षांचे बोनाफाईड सर्टिफिकेट / कॉलेज आयकार्ड

05.पालकाचे मागील वर्षांचे वार्षिक उत्पनाचा दाखला

06.अपंगत्व असल्यास , प्रमाणपत्र

अर्ज कसा कराल : वरील अर्हता धारण करणारे इच्छिक विद्यार्थ्यांनी आपले आवेदन हे दि.15 ऑक्टोंबर 2023 पर्यंत reliance-foundation-scholarships या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत .

Leave a Comment