आता केवळ 2 मिनिटात 7/12 वरती वारसांची नोंदणी करता येणार ! जाणून घ्या सविस्तर बातमी !

Spread the love

शेतकरी बांधवांसाठी नवीन पोर्टल वर आनंदाची बातमी आहे ती बातमी अशी आहे सातबारा उताऱ्यावर तुम्हाला ऑनलाइन पध्दतीने तुमच्या वारसाची नोंदणी करता येणार आहे. ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. वारसाची नोंदणी करायची असल्यास पहिले रजिस्ट्री ऑफिसला जावे लागत होते.

परंतू आता सर्व सिस्टीम ऑनलाइन असल्यामुळे ऑनलाइन पध्दतीने सुद्धा तुम्ही तुमच्या सातबारा उताऱ्यावर तुमच्या वारसाची नोंदणी करू शकता.वडिलोपार्जित शेतजमिन नावावर करायची असेल तर तलाठी कार्यालया मध्ये जाण्याची गरज नाही.

महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाअंतर्गत हे हक्क प्रणाली सुरू झाली असून या हक्क प्रणालीच्या मदतीने शेतकरी जमिनीच्या बाबतीत खूप काही कामे ऑनलाइन पध्दतीने करू शकते. या कामात विशेष करून सातबारा उताऱ्यावर वारस नोंदणी करणे, सातबारा उतारा दुरुस्ती करणे, सातबारा उताऱ्यावर बोजा चढवणे किंवा कमी करणे बोरवेलची नोंदणी करणे हे सर्व कामे आपल्याला ई हक्क प्रणालीच्या माध्यमाने ऑनलाइन करता येणार आहे.

या ई हक्क प्रणालीमुळे बर्‍याचशा शेतकऱ्यांची वेळेची बचत होणार आहे आणि खर्च सुद्धा कमी होणार आहे.

Leave a Comment