सोलापुर , कोल्हापुर व नाशिक महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 3,514 जागांसाठी मेगाभर्ती 2023

Spread the love

राज्य शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र महानगरपालिकेमध्ये , तब्बल 40 हजार जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . यापैकी राज्यातील सोलापूर , कोल्हापूर व नाशिक महानगरपालिकेतील पदभरती प्रक्रिया बाबतची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे . सोलापुर , कोल्हापूर व नाशिक महानगरपालिकेतील मिळून एकुण रिक्त पदांची संख्या 3,514 आहे .

सोलापुर महानगरपालिकेमध्ये एकुण मंजुर पदांची संख्या 1026 आहे तर त्यापैकी 562 पदे भरलेली आहेत .तर मंजुर पदांपैकी रिक्त पदांचा आकडा 464 इतका आहे .आता महानगरपालिकेच्या आवश्यकतेनुसार एकुण 340 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . यामध्ये संवर्ग अ,ब, क व ड पदांचा समावेश असणार आहे .पदभरती प्रक्रिया साठी सोलापूर महापालिकेने सुधारित करण्यात आलेली पदांची बिंदुनामावली पुणे मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेण्यात आलेली आहे .

कोल्हापुर महानगरपालिकेमध्ये एकुण 4661 पदे मंजुर आहेत , त्यापैकी 2,879 पदे भरलेली असून रिक्त पदांचा आकडा 1782 आहे .सदर रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया करण्याबाबत सुधारित आकृतीबंध कोल्हापुर पालिका प्रशासनांकडून तयार करण्यात आलेला आहे .रिक्त पदांपैकी पालिका प्रशासनांच्या 35 टक्के पेक्षा अधिक उत्पन्न कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होणार नाही अशा पद्धतीने पदभरती करण्याचे आदेश राज्य शासनांकडून देण्यात आलेले आहेत .

नाशिक महानगरपालिकेमध्ये या अगोदरच काही पदांवर पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती . परंतु कोरोना महामारीच्या काळामध्ये , सदर पदभरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आलेली आहे . आता नव्याने रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .नाशिक पालिका प्रशासनांमध्ये वर्ग क व वर्ग ड संवर्गात एकुण 706 जागांसाठी पदभरती प्रक्रिया करण्यात येणार आहेत .

पालिकानिहाय पदभरती जाहीरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

जाहिरात पाहा

Leave a Comment