SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 314 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

स्टील अथॉरिटी ऑफ इंडीया लि. मध्ये 314 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Steel Authority Of India Limited Recruitment For Various Post , Number of  Post Vacancy – 314 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता यांसदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post name / Number of  Post ) : यांमध्ये ऑपरेटर कम टेक्निशियन ( ट्रेनी ) पदांच्या एकुण 314 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्यात मेट्रोमध्ये 75 जागेसाठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 18.03.2024 रोजी  किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये SC / ST प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क: जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://sail.ucanapply.com/  या संकेतस्थळावर दिनांक 18.03.2024 पर्यत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 500/- तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांकरीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment