मेगाभर्ती : तलाठी पदांच्या जिल्हा निहाय रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध !

Spread the love

राज्य शासनाकडून तलाठी साझा पुनर्रचना समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने पुनर्रचना करण्यात आलेली तलाठी साझे व महसूल मंडळाकरिता पदनिर्मिती करून जिल्हा निहाय रिक्त पदावर पद भरती करणे , संदर्भात राज्य शासनाचे महसूल व वन विभागाकडून पदभरती शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग व सचिव वित्त विभाग यांच्या उपस्थितीने दिनांक 28 जानेवारी 2022 रोजी दिलेल्या मान्यतेनुसार व माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत उच्चस्तरीय सचिव समितीने दिनांक 29.04.2022 रोजी दिलेल्या मान्यतेप्रमाणे तलाठी साझा पुनर्रचनेनुसार विहित केलेल्या निकषांच्या आधारे संबंधित विभागीय आयुक्त यांच्याकडून महसुली विभाग निहाय प्राप्त माहितीसह अनुसरून वाटप करण्यात आलेले आहेत .यामध्ये 3,110 तलाठी साझे व 518 महसुली मंडळ कार्यालया करिता 3,110 तलाठी तर 518 मंडळ अधिकारी असे एकूण 3,628 पदे निर्माण करण्यास शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेली आहे .

तलाठी भरती जाहिरात

यानुसार विभागनिहाय , जिल्हा नुसार रिक्त पदांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .यामध्ये पुणे विभागामध्ये एकूण तलाठी 602 पदे तर मंडळ अधिकाऱ्यांच्या 100 पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे . तर अमरावती विभागामध्ये तलाठी पदांच्या 106 तर मंडळ अधिकारी पदांच्या 18 जागा साठी मंजुरी देण्यात आलेली आहे . त्याचबरोबर नागपूर विभागासाठी एकूण 478 तलाठी पदांच्या तर मंडळ अधिकाऱ्यांच्या 80 जागेसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे .तर औरंगाबाद विभागाकरिता एकूण तलाठी पदांच्या 685 तर मंडळ अधिकारी पदांच्या 114 जागेसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे .

त्याचबरोबर नाशिक विभागाकरिता तलाठी पदांच्या 689 तर मंडळ अधिकारी पदांच्या 115 जागेसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे . तसेच कोकण विभागाकरिता तलाठी पदांच्या 550 व मंडळ अधिकारी पदांच्या 91 जागेसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे .

तलाठी व मंडळ अधिकारी पदांच्या रिक्त जागेची संख्या खालील प्रमाणे पाहू शकता

जिल्हानिहाय रिक्त पदे पाहण्यासाठी सविस्तर पदभरती GR डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

पदभरती जाहिरात पाहा

Leave a Comment