RPF : रेल्वे सुरक्षा दलामध्ये ‘ पोलीस शिपाई ‘ पदांच्या 19,012 जागेसाठी मेगा भरती ! Apply Now !

Spread the love

भारतीय रेल्वे सुरक्षा दलामध्ये पोलीस शिपाई पदांच्या एकूण 19,012 जागेसाठी पदभरती यासंदर्भात नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .या नोटिफिकेशन नुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येणार आहे . या संदर्भात अधिक माहिती घेऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता .

सदरची भरती रेल्वे सुरक्षा अंतर्गत ‘ पोलीस शिपाई ‘ या पदाकरिता महाभरती प्रक्रिया राबवण्याबाबत रेल्वे बोर्डाकडून भरती प्रक्रिया संदर्भातील नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेली असून , एकूण रिक्त पदांची संख्या 19,012 असून रेल्वेच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक वाढीव पदे मंजूर करण्यात आलेली आहेत . असे मिळून एकूण 19,012 जागेसाठी पदभरती प्रक्रिया , संदर्भातील नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .

रेल्वे सुरक्षा पोलीस शिपाई पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवाराची किमान शैक्षणिक करता बारावी (HSC ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आवश्यक आहे , तसेच उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे . तसेच उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे .

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF ) पोलीस शिपाई पदाकरिता पुरुष उमेदवाराची उंची 165 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे . तर मागासवर्गीय पुरुष उमेदवारांकरिता 160 सेंटिमीटर असणे आवश्यक आहे . तर महिला उमेदवारांकरिता 165 सेंटिमीटर उंची असणे आवश्यक आहे . तर मागासवर्गीय महिला उमेदवारांकरिता 157cm उंची असणे आवश्यक आहे .

निवड प्रक्रिया – उमेदवाराची सर्वप्रथम 100 गुणांची लेखी चाचणी घेण्यात येईल , त्यानंतर लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण उमेदवारांची 100 गुणांची शारीरिक पात्रता चाचणी घेण्यात येईल . यानंतर लेखी व शारीरिक पात्रतेच्या गुणांची एकूण बेरीज करून गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल .

Apply Online

Leave a Comment