वखार महांमंडळ मध्ये विविध पदांच्या तब्बल 153 जागेसाठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

केंद्र शासनाच्या अधिनस्थ असणाऱ्या केंद्रीय वखार महामंडळ मध्ये विविध पदांच्या तब्बल 153 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Warehouseing Corporation Department Recruitment Various Post ) पदनाम , पदसंख्या या संदर्भातील सविस्तर महाभरती प्रक्रिया खालीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या :  यांमध्ये सहाय्यक अभियंता ( सिव्हिल ) पदांच्य 18 जागा , सहाय्यक अभियंता ( इलेक्ट्रिकल ) पदांच्या 05 जागा , अकाउंटंट पदांच्या 24 जागा , सुपरिटेंडेंट ( जनरल ) पदांच्या 11 जागा , कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांच्या 81 जागा , सुपरिटेंडेंट ( जनरल ) पदांच्य 02 जागा , कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक SRD पदांच्या 02 जागा अशा एकुण 153 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

आवश्यक अर्हता : अभियांत्रिकी पदवी / कृषी पदवी / बी.कॉम /सीए / कोणत्याही शाखेतील पदवी ..

वयोमर्यादा : सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी दि.24.09.2023 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 30 वर्षे पर्यंत असणे आवश्यक असणार आहेत , तर यांमध्ये मागास प्रवर्ग करीता 05 वर्षांची सुट तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .

हे पण वाचा : सहकार वाणिज्य विभाग मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / परीक्षा शुल्क : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची दिनांक 24.09.2023 अशी असून , अर्ज करण्याचे अधिकृत्त संकेतस्थळ  https://ibpsonline.ibps.in/cwcaug23/ हे आहे . सदर भरती प्रक्रिया करीता 1250/- रुपये तर मागास प्रवर्ग मधील उमेदवारांकरीता 400/- परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

सविस्तर जाहिरात / अर्ज करा

Leave a Comment