महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदेमध्ये तब्बल 13,514 जागेसाठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , पदांनुसार आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये अर्ज प्रक्रिया मागविण्यात येणार आहे .राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध पदांच्या सुधारित आकृतीबंध तयार करण्याचे कामकाज प्रशासनाकडुन सुरु असून पदभरतीची जाहीरात पुढील महिन्यांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे .
यामध्ये कनिष्ठ अभियंता , ग्रामसेवक , औषध निर्माण अधिकारी , विस्तार अधिकारी , वरिष्ठ अधिकारी , अंगणवाडी सेविका , मदतनिस , कनिष्ठ लिपिक , लेखाधिकारी इत्यादी पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत .जिल्हा परिषद विभागांकडुन संबंधित कार्यालयातील मंजुर पदे , रिक्त पदे व आवश्यक पदांचा आढावा घेण्यात येत असून सदर रिक्त पदांवर नव्याने आकृत्तीबंध तयार करुन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
सदर पदभरतीचा आकृत्तीबंध जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तयार करुन राज्य शासनास सादर करण्याचे आदेश संबंधित विभाग कार्यालयांना देण्यात आलेले आहेत .तसेच राज्य शासनाकडुन जिल्हा परिषदेमध्ये रिक्त पदांपैकी 13,514 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत अधिसुचना ( शासन निर्णय ) निर्गमित झालेला आहे .
या भरती प्रक्रिया संदर्भातील अधिकृत्त अधिसुचना पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .