महाराष्ट्र राज्य शासकीय कार्यालयातील गट -क मधील लिपिकवर्गीय पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरणेबाबत सामान्य प्रशासन विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय दि.02.11.2022 रोजी राज्य शासनाकडुन निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील सामान्य विभागाचा दि.02.11.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .
राज्य शासकीय कार्यालयातील वर्ग – क मधील लिपिक वर्गीय संवर्गातील सर्व पदे यापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ( MPSC मार्फत ) भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे . या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेली कार्यपद्धती सर्व लिपिक वर्गीय पदभरतीसाठी लागू असणार आहेत . यापैकी प्रथम टप्यात लिपिक – टंकलेखकांची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतील .मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधिनस्त सर्व क्षेत्रिय कार्यालयाचे नियुक्ती प्राधकिारीनिहाय गट – क मधील सरळसेवेने भरावयाच्या लिपिक – टंकलेखक पदांचे मागणीपत्र क्षेत्रिय कार्यालयाकडुन मागविण्यात येणार आहे .
तर बृहन्मुंबई व बृहन्मुंबईबाहेरील कार्यालयातील लिपिक – टंकलेखक पदांचे नियुक्ती प्राधिकारी एकच असतील अशा मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने बृहन्मंबई व बृहन्मुंबईबाहेरील कार्यालयासाठी स्वतंत्र मागणीपत्र मागणीपत्र मागणीवण्यात आले आहे . सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी विहीत नमुन्यामध्ये विहीत कालावधीत नियुक्ती प्राधिकारीनिहाय मागणीपत्र MPSC आयोगाकडे पाठविण्यासाठी मंत्रालय प्रशासकीय विभागस्तरावर सह / उप सचिव यांची समन्वय अधिकारी म्हणुन नेमणूक करण्यात येणार आहे .
भरती प्रक्रिया संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाचा दि.02.11.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !