मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना सामाजिक विभागाच्या निकषानुसार , वर्षाला 60,000/- रुपये वसतिगृह निर्वाह भत्ता म्हणुन देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे . यामुळे मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वर्षाला साठ हजार रुपये शिष्यवृत्ती / विद्यावेतन म्हणुन दिली जाणार आहे .
राज्यामध्ये मराठा समाजा आरक्षण नसल्याने , मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक अडचणींचा मोठा सामना करावा लागतो .यासाठी सारथी संस्थेमार्फत राज्यामध्ये सर्व जिल्हांमध्ये वसतिगृह उभारले जाणार आहे . तोपर्यंत विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्वाह भत्ता म्हणुन एका शैक्षणिक वर्षामध्ये 60,000/- रुपये शिष्यवृत्ती अदा करण्यात येणार आहे . या करीता मंत्रीमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे . या समिती मार्फत शिष्यवृत्ती योजनेचे निकष तसेच शिष्यवृत्ती योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे .
भविष्यात राज्यात सर्व जिल्हात एकुण 100 वसतिगृहांची उभारणी करण्यात येणार आहे .त्याचबरोबर NCERT स्कॉलरशिप उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वार्षिक 9600/- रुपये तर देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी 50,000/- रुपये ,त्याचबरोबर परदेशात उच्च शिक्षणासाठी देखिल शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026