महाराष्ट्र राज्य शासकीय कार्यालयातील गट -क मधील लिपिकवर्गीय पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरणेबाबत सामान्य प्रशासन विभागाचा महत्वपुर्ण शासन निर्णय दि.02.11.2022 रोजी राज्य शासनाकडुन निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील सामान्य विभागाचा दि.02.11.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .
राज्य शासकीय कार्यालयातील वर्ग – क मधील लिपिक वर्गीय संवर्गातील सर्व पदे यापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ( MPSC मार्फत ) भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे . या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेली कार्यपद्धती सर्व लिपिक वर्गीय पदभरतीसाठी लागू असणार आहेत . यापैकी प्रथम टप्यात लिपिक – टंकलेखकांची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतील .मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधिनस्त सर्व क्षेत्रिय कार्यालयाचे नियुक्ती प्राधकिारीनिहाय गट – क मधील सरळसेवेने भरावयाच्या लिपिक – टंकलेखक पदांचे मागणीपत्र क्षेत्रिय कार्यालयाकडुन मागविण्यात येणार आहे .
तर बृहन्मुंबई व बृहन्मुंबईबाहेरील कार्यालयातील लिपिक – टंकलेखक पदांचे नियुक्ती प्राधिकारी एकच असतील अशा मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने बृहन्मंबई व बृहन्मुंबईबाहेरील कार्यालयासाठी स्वतंत्र मागणीपत्र मागणीपत्र मागणीवण्यात आले आहे . सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी विहीत नमुन्यामध्ये विहीत कालावधीत नियुक्ती प्राधिकारीनिहाय मागणीपत्र MPSC आयोगाकडे पाठविण्यासाठी मंत्रालय प्रशासकीय विभागस्तरावर सह / उप सचिव यांची समन्वय अधिकारी म्हणुन नेमणूक करण्यात येणार आहे .
भरती प्रक्रिया संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाचा दि.02.11.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- श्रीम.नाथीबाई दामोदर महिला विद्यापीठ मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , Apply Now !
- सैनिकी शाळा चंद्रपुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- भारतीय नौदल अंतर्गत नेव्ही अधिकारी (Navy officer) पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत सहाय्यक , लिपिक , चालक , परिचर , सेवक , ग्रंथालय परिचर इ. पदांच्या 197 जागेसाठी महाभरती !
- महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत अध्यापक , प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक , परिचर इ. पदांसाठी पदभरती .