शेतकरी वर्गाला आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी यासोबतच त्यांचे आयुष्यमान उंचावण्यासाठी शासन अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना नियमितपणे राबवत आहे. शासनाने राबवलेल्या विविध योजनांमध्ये प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा सुद्धा समावेश होत आहे. ज्याला किसान पेन्शन योजना असे सुद्धा संबोधले जाते. मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना पेन्शन सुरू होणार आहे आणि ही पेन्शन दरमहा तीन हजार रुपये शासन आपल्या खात्यात जमा करणार आहे. तर काय आहे ही योजना, यासोबतच कोणकोणते शेतकरी याचा लाभ घेऊ शकतील आणि या योजनेचे स्वरूप काय आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया.
देशातील शेतकरी बंधू-भगिनींचे भविष्य सुरक्षित करण्याकरिता तुम्ही दोनशे रुपये पर्यंत गुंतवणूक करू शकतात आणि त्यानंतरच म्हणजे वयाच्या साठाव्या वर्षापासून तुम्हाला प्रत्येक महिना तीन हजार रुपये पेन्शन शासनामार्फत दिली जाईल. 18 ते 40 वयोगटातील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. शेतकरी मित्रांनो आतापर्यंत या योजनेमध्ये 19 लाख 23 हजार शेतकरी सहभागी झाले आहेत आणि अजून अर्जदारांची संख्या वाढत आहे.
प्रधानमंत्री किसान मानधन योजना
पी एम किसान मानधन योजनेच्या माध्यमातून 18 ते 40 वयोगटातील अत्यल्प भूधारक शेतकरी, यासोबतच लहान शेतकरी यांचा लाभार्थीच्या यादीमध्ये समावेश होत आहे. भारत देशामधील ज्या शेतकरी बंधू भगिनींकडे दोन हेक्टर पेक्षा कमी किंवा दोन हेक्टर पर्यंत शेतजमीन आहे ते पी एम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज करू शकणार आहेत.
• या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 वयोगटातील शेतकरी बंधू भगिनींना दरमहा 22 रुपये भरावे लागणार आहेत.
• यासोबतच तीस वर्षाच्या शेतकऱ्यांकरिता या योजनेचा लाभ घेण्यासाठी दरमहा 110 रुपये भरावे लागणार आहेत.
• आणि मित्रांनो चाळीस वर्षाच्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर दरमहा दोनशे रुपये भरावे लागणार आहेत.
• यानंतर शेतकरी बंधू भगिनींनो वरील प्रक्रिया केल्यास वयाच्या साठाव्या वर्षानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये शासन तुमच्या खात्यात जमा करेल यासोबतच वार्षिक 36 हजार रुपये या योजनेतून तुम्हाला मिळेल.
समजा दुर्दैवाने लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाला असेल तर पी एम किसान मानधन योजनेच्या माध्यमातून अर्ज केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीला ही पेन्शन मिळेल. त्यामुळे या योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या पत्नीला किंवा शेतकऱ्याच्या वारसाला दरमहा पंधराशे रुपये पेन्शन दिली जाईल. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो ही शासकीय योजना फक्त शेतकऱ्यांनाच नव्हे तर शेतकरी कुटुंबांना आर्थिक सुरक्षा या सोबतच सामर्थ्य प्रदान करण्याचे काम करत आहे.
पी एम किसान सन्माननीय योजनेच्या माध्यमातून सुद्धा वार्षिक शेतकऱ्याला सहा हजार रुपये दिले जातात. यासोबतच पी एम किसान मानधन योजनेच्या माध्यमातून वार्षिक शेतकऱ्याला 36 हजार रुपये दिले जातात. म्हणजे एकूण 42 हजार रुपये शेतकऱ्यांना योजनेच्या माध्यमातून देत आहे. नक्कीच या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होणार असून इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा.
अर्ज करण्याकरिता लागत असणारी आवश्यक कागदपत्रे.
• आधार कार्ड
• ओळखपत्र
• वय प्रमाणपत्र
• उत्पन्न प्रमाणपत्र
• पासपोर्ट आकाराचा फोटो
• नोंदणीकृत मोबाईल क्रमांक
या ठिकाणी अर्ज करावा
पी एम किसन मानधन योजनेचा लाभ घेण्याकरिता तुम्ही जवळच्या सीएससी म्हणजेच कॉमन सर्विस सेंटरला भेट देऊन अर्ज करू शकता.शेतकऱ्यांसाठी शासनाने मोबाईल वरून अर्ज करण्याची सुविधा सुद्धा केली आहे. यासाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरती भेट देऊन तुम्ही अर्ज करू शकता. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची https://pmkmy.gov.in/ ही वेबसाईट आहे. या वेबसाईट वरती जाऊन अर्ज करावा.
- भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे मर्चंटस् सहकारी बँक लि. अंतर्गत अधिकारी , लिपिक , ऑपरेटर , अकौंट अधिकारी , शिपाई / चालक इ. पदांसाठी पदभरती !
- PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- अल्पसंख्याक दर्जा मान्यता प्राप्त शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षण सेवक , स्वयंपाकी , कामाठी पदावर नियमित वेतनश्रेणी पदभरती !
- Mahavitaran : महावितरण अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !