महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये विविध शिकाऊ पदांच्या एकुण 34 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Road Transport Corporation Recruitment for various post , Number of post vacancy – 34 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पदविका अभियांत्रिकी | 01 |
| 02. | यांत्रिकी मोटार गाडी | 20 |
| 03. | वीजतंत्री | 03 |
| 04. | मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर | 09 |
| 05. | वेल्डर | 01 |
| एकुण पदांची संख्या | 34 |
पात्रता / वयोमर्यादा – अभियांत्रिकी पदाकरीता मेकॅनिक / ॲटोमोबाईल अभियंता शोखेमधुन पदवी / पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . इतर सर्व पदांकरीता 10 वी उत्तीर्ण उत्तीर्ण असणे आवश्यक + संबंधित ट्रेड मध्ये सरकारमान्य आयटीआय मधुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .सदर पदांकरीता उमेदवारांचे वय दि.07.12.2022 रोजी 14 वर्षे ते 35 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे तर मागास प्रवर्गातील उमदेवारांकरीता वयामध्ये पाच वर्षांची सुट देण्यात आली आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने विभाग नियंत्रक राज्य परिवहन विभागीय कार्यालय , अतिरिक्त औद्यागिक वसाहत एन.आर.बी.कंपनी औरंगाबाद रोड जालना या पत्त्यावर दि.07.12.2022 पर्यंत पाहोचेल असे पाठवावे .सदर पदभरती करीता आवेदन शुल्क म्हणुन 590/- रुपये तर मागासप्रवर्गाकरीता 295/- आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026