भारतीय आयुर्विमा महामंडळ मध्ये तब्बल 9,400 जागांसाठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .भारतीय आयुर्विमा ही विमा क्षेत्रातील सर्वात मोठी संस्था असून , केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे . सदर महामंडळमध्ये रिक्त जागांवर मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत , सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नाव – प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी , एकुण पदांची संख्या
भारतीय आयुर्विमा महामंडळ कडुन विभागनिहाय रिक्त पदांची संख्या जाहीर करण्यात आलेली असून ,झोनल निहाय उमेदवारांना अर्ज सादर करायचे आहे . भारतामधील सर्व झोनलच्या रिक्त जागेवर पदभरती राबविण्यात येत आहे .यामध्ये महाराष्ट्र झोनलचा विचार केला असता , महाराष्ट्र ( वेस्टर्न झोनल ऑफीस ) विभागांमध्ये तब्बल 1942 जागा रिक्त आहेत .
पात्रता – सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतील ( Any fild Graduate ) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .किंवा भारतीय विमा संस्थान , मंबई यांची फेलोशिप पात्रता असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दि.01 जानेवारी 2023 रोजी 21 वर्षे ते 30 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .यामध्ये मागास वर्गीय ( SC / ST ) उमेदवारांना वयांमध्ये 5 वर्षे तर इतर मागास वर्गीय ( OBC ) उमेदवारांकरीता वयांमध्ये 3 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – खाली दिलेल्या लिंकवर आवश्यक शैक्षणिक पात्रतधारक उमदेवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.10 फेब्रुवारी 2023 पर्यंत सादर करायचे आहे . सदर भरती प्रक्रिया करीता उमेदवारांकडून आवेदन शुल्क म्हणून 750/- तर मागासवर्गीय उमेदवारांकरीता 100/- रुपये स्विकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!