राज्य शासनाच्या महसुल विभागाकडून तलाठी व मंडळ अधिकारी पदांच्या रिक्त जागांचे अहवाल राज्य शासनाकडे सादर केले असून , सदर रिक्त पदांपैकी 100 टक्के पदे त्याचबरोबर काही वाढीव पदे निर्माण करुन पदभरती प्रक्रीया राबविण्यासाठी राज्य शासनाला अखेर मुहुर्त सापडला आहे .
31 मार्च 2023 पर्यंत राज्यातील जवळपास 15 टक्के कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत , यापैकी महसूल विभागाचा विचार केला असता महसुल विभागांमध्ये 3 टक्के कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत . यामुळे आता राज्यातील सर्वच विभागांमध्ये कर्मचारी मनुष्यबळांची कमतरता भासणार आहे .तलाठी संवर्गातील पदे मोठ्या प्रमाणांमध्ये रिक्त असल्याने , सदर महसूल विभागातील पदभरती प्रक्रिया माहे एप्रिल महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पदभरती प्रक्रिया पुर्ण करण्यात येणार आहे .
यासाठी राज्य शासनांकडून आयबीपीएस कंपनीमार्फत परीक्षा आयोजित करण्यासाठी कंपनी निवड करुन परीक्षेचे आयोजन करण्याची सुचना देण्यात आलेल्या आहेत .तलाठी पदांच्या पदभरती बरोबरच राज्यातील महसूल विभागातील कारकून , मंडळ अधिकारी , लिपिक टंकलेखनसह शिपाई इ.पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026