महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळामध्ये चालक, वाहक, लिपिक आणि इतर पदांसाठी 13,567 जागांची महाभरती होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.
मात्र, या भरतीबाबत एसटी महामंडळाने स्पष्टीकरण दिले असून 13,567 पदांसाठी सध्या कोणतीही अधिकृत भरती प्रक्रिया सुरू केलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी सोशल मीडियावरील अशा पोस्टवर किंवा अनधिकृत जाहिरातींवर विश्वास ठेवू नये.
दरम्यान, एसटी महामंडळातील रिक्त पदे भरण्याबाबत भविष्यात अधिकृत निर्णय किंवा जाहिरात प्रसिद्ध झाल्यास त्यामध्ये पदांची संख्या, पदनिहाय पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची तारीख आणि अर्जाची अधिकृत लिंक याबाबत माहिती दिली जाईल.
उमेदवारांसाठी सूचना :
भरतीची अधिकृत माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरील जाहिराती तपासा. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीला अर्जाचे शुल्क किंवा वैयक्तिक माहिती देऊ नका.
- BHEL मध्ये 660 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू! ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी
- ONGC मध्ये 3,047 पदांसाठी भरती जाहीर! 10 वी, ITI, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांना संधी
- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..