कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना मध्ये पदवी / 12 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 2859 पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्रत उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Employee’s Provident Fund Organisation Recruitment for Social Cecurity Assistant and Stenographer ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यामध्ये सोशल सिक्योरिटी सहाय्यक ( वर्ग क ) पदांच्या 2674 , तर स्टनोग्राफर पदांच्या एकुण 185 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .दोन्ही पदे मिळून एकुण 2 हजार 859 पदांकरीता महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
पात्रता – सोशल सिक्योरिटी सहाय्यक ( वर्ग क ) पदांकरीता उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर संगणकावर इंग्रजी टायपिंग परीक्षा 35 श.प्र.मि / हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर स्टनोग्राफर पदांकरीता उमेदवार हा इयत्ता बारावी ( HSC ) बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच स्टेनो कौशल्य चाचणी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.26 एप्रिल 2023 रोजी किमान वय 18 वर्षे व कमाल वय 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .यामध्ये मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच वर्षांची तर इतर मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026