कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन मध्ये गट क संवर्गातील तब्बल 2859 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे जाणून घेऊया ..
यामध्ये सोशल सिक्योरिटी सहाय्यक पदांच्या 2,674 जागेसाठी तर स्टेनोग्राफर (गट क ) पदाच्या 185 जागांसाठी असे , एकूण 2859 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . सोशल सिक्योरिटी सहाय्यक या पदाकरिता उमेदवार हा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
त्याचबरोबर उमेदवार हा इंग्रजी किंवा हिंदी भाषेमध्ये टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर स्टेनोग्राफर पदाकरिता उमेदवार हा इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर स्टेनो कौशल्य चाचणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा : सदर पदाकरिता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराची वय दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी किमान 18 वर्षे ते कमाल 27 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे , SC / ST प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षाची सूट तर इतर मागासवर्गीय उमेदवारांना वयामध्ये तीन वर्षाची सूट देण्यात येईल .
जाहिराती मध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज https://recruitment.nta.nic.in/EPFORecruitment/Page/. या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने दिनांक 26 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे . सदर पद भरती प्रक्रिया करिता 700/- रुपये आवेदन शुल्क आकारले जाणार आहे , तर मागासवर्गीय / माजी सैनिक / महिला प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाही .
1) सोशल सिक्योरिटी सहाय्यक पदांसाठी जाहिरात पाहा
2) स्टनोग्राफर पदांसाठी जाहिरात पाहा
- GTDC : गोवा पर्यटन विकास महामंडळ मध्ये पदभरती 2023 , लगेच करा आवेदन ! लगेच करा आवेदन !
- MPCB : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
- मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय मुंबई येथे विविध पदांच्या 144 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- नमो महारोजगार मेळावा : विविध पदांच्या तब्बल 10,000+ जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र जिल्हा न्यायालय मध्ये तब्बल 5,793 जागेवर लघुलेखक , कनिष्ठ लिपिक , शिपाई / हमाल पदांकरीता महाभरती !