आदिवासी विकास विभाग नाशिक येथे पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांकडुन विहीत कालावधीत ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , शैक्षणिक अर्हता इत्यादी बाबतीत सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये वरिष्ठ सल्लागार पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा एम.एस्सी ॲग्रीकल्चर अथवा समकक्ष पदवी एमबीए ( विपणन ) / PGP ॲग्रो व्यवसाय व्यवस्थापन पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर ग्रामीण भागात प्राधान्याने आदिवासी विकास विभागामध्ये शेती व विपणन विभागाचे काम केले असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहेत .
हे पण वाचा : पुणे येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया ! लगेच करा अर्ज !
कामाचे स्वरुप – आदिवासी भागांमध्ये विविध शेती विषयक / वनशेती विषयक व वनउपज विषयक योजनांचा अर्थसहाय्यक करण्यासाठी प्रस्तावांची छाननी करणे , प्रस्ताव मंजुर करण्यासाठी सल्ला देणे , मंजर योजनांचे मुल्यमापन करणे , त्याची तपासणी करणे , विपणन विषयक कामे पाहणे , जिल्हानिहाय आदिवासी भागात कशा प्रकारची शेती करणे याबाबत सल्ला देणे अशा नेमुण दिलेली कामे पाहावे लागतील .
हे पण वाचा : शिक्षक / शिक्षकेत्तर पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ , आदिवासी विकास भवन दुसरा मजला राम गणेश गडकरी चौक जुना आग्रा रोड नाशिक या पत्त्यावर दि.30 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज पाहोचेल अशा पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे .
अधिक माहीतीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026