महाराष्ट्र राज्य शासन सेवेच्या महसुल विभागांमध्ये बऱ्याच दिवसांपासून तलाठी पदभरती प्रक्रिया प्रलंबित आहे . परंतु आता सदर तलाठी मेगाभरती प्रक्रिया 2023 ला अंतिम स्वरुप आले आहे . सदर पदभरती प्रक्रिया संदर्भात महसूल व वनविभागांकडून सुधारित परिपत्रक दि.27.04.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
महसुल विभागातील गट -क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 बाबत राज्यातील सर्व उपआयुक्त महसूल तथा विभागीय समन्वये अधिकारी (कोकण / पुणे / नाशिक / औरंगाबाद / अमरावती / नागरपूर विभाग ) यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक गुरुवार दि.04.05.2023 रोजी दुपारी 3.00 वाजता आयोजित बैठकीस पाचारण केले आहे .
हे पण वाचा : पिंपरी चिंचवड पालिके मध्ये आत्ताची नवीन सुधारित मेगाभर्ती 2023 !
महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी पदभरतीचे अनुषंगाने एकुण भरावयाची पदे ,परीक्षेची दिनांक निश्चित करणे , पदभरतीची कार्यपद्धती तसेच अनुसूचित क्षेत्रातील रिक्त पदांच्या भरती अद्यावत आकडेवारी इ.बाबत सविस्तर आढावा घेणे इ. कामी मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक , भूमी अभिलेख ( महाराष्ट्र राज्य ) पुणे यांचे अध्यक्षेतेखाली गुरुवारी दि.04.05.2023 रोजी दुपारी 3.00 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक आयोजित करणेत आलेली आहे .
सदर आढावा बैठकीसाठी वरील नमुद सर्व उपआयुक्त यांना सर्व माहितीसह व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेशित करण्यात आलेले आहेत . सदर तलाठी मेगाभरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता .

- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !