जिल्हा परिषदेच्या 75 हजार भरती कोट्यापैकी 18,939 पदांसाठी नविन मेगाभरती प्रसिद्ध !

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासन सेवेत स्वातंत्र्याच्याा अमृत महोत्सवी वर्षात 75,000 पदे भरणेबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांनी निर्धार केला होता . सदर 75 हजार कोट्यापैकी ग्रामविकास विभागांकडून विविध संवर्गातील तब्बल 18,939 पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यातबाबत पुणे येथे दि.28.04.2023 आणि 29 एप्रिल 2023 या दोन दिवशी कार्यशाळेचे आयोजन ग्राम विकास विभागाकडून करण्यात आलेले होते .

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अंदाजे 75 हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचा शासनाने निर्धार केला असून दि.15 ऑगस्ट 2023 पुर्वी सदर पदे भरावयाची आहेत . ग्रामविकास विभागाच्या अखत्यारितील जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील आरोग्य व इतर विभागातील सवंर्गाच्या पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम विभागाच्या अनुक्रमे 21 ऑक्टोंबर 2022 व दि.15 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आला होता .

हे पण वाचा : तलाठी मेगाभर्ती प्रक्रियेस अखेर सुरुवात !

सदर जाहीरातीद्वारे सर्व जिल्हा परिषदांतील विविध संवर्गातील एकुण 18,939 पदे भरण्यात येणार आहेत . दि.05 जुलै 20104 च्या शासन निर्णयामध्ये प्रत्येक संवर्गासाठी परीक्षेची काठीण्य पातळी ठरवून दिलेली आहे .सदरची काठिण्य पातळी प्रश्नपत्रिका तयाय करण्यासाठी काठीण्य पातळी ठरवून दिलेली आहे .

उमेदवारांना अभ्यासक्रमाची माहीती होत नाही , यासाठी परीक्षेचा अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकेचे स्वरुप यांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे , याकरीता मा.अपर मुख्य सचित ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षेखाली शुक्रवार व शनिवार अनुक्रमे दि.28 व 29 एप्रिल 2023 रोजी हॉटेल सयाची मुंबई – बँगलोर बायपास हायवे वाकड पुणे येथे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते .

या संदर्भात पदभरती बाबत ग्रामविकास विभागाकडून दि.25 एप्रिल 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

पदभरती परिपत्रक

Leave a Comment