केंद्र सरकारमार्फत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी केवळ गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते .या योजनेचा लाभ सर्व प्रवर्गातील विद्यार्थी घेवू शकतात . या योजनेची पात्रता , अर्ज कसा करायचा त्याचबरोबर शिष्यवृत्तीची रक्कम किती मिळते . याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .
हि शिष्यवृत्ती योजना केंद्र सरकारकडुन राबविण्यात यते ,ही शिष्यवृत्ती पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना दिली जाते .पदवी अभ्यासक्रमासाठी 10,000/-रुपये शिष्यवृत्ती दिली जाते , तर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी 20,000/- रुपये शिष्यवृत्ती दिली जाते .कोणत्याही शाखेमध्ये पदवी /पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पुर्ण करत असलेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते .या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी 12 वी मध्ये 75 टक्के गुण असणे आवश्यक आहे .तर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना पदवीमध्ये 70 टक्के गुण असणे आवश्यक आहे .शिवाय अनुसुचित जाती / अनुसुचित जमाती विद्यार्थ्यांना गुणांमध्ये 5 टक्के सवलत देण्यात येते .
असा करा अर्ज –
या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा असल्यास आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधून अर्ज सादर करु शकता . किंवा ऑनलाईन अर्ज करु शकता. या शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेता नाही . यामुळे सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती लाभ घेण्यासाठी राज्य शासनाच्या भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर राज्य सरकारच्या शिष्यवृत्ती योजनाचा लाभ घेता येत नाही .
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी https://scholarships.gov.in/ या संकेतस्थळावर क्लिक करुन सविस्तर आवेदन करु शकता . अर्ज सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे सर्व कागतपत्रे असणे आवश्यक आहे . व शिष्यवृत्तीसाठी राष्ट्रीयकृत्त बँकेचे खाते असणे आवश्यक आहे .
- UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 111 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- MahaTransco : महा – पारेषण कंपनी अंतर्गत अभियंता , व्यवस्थापक , लिपिक (कनिष्ठ/ वरीष्ठ ) इ. पदांच्या 493 जागेसाठी महाभरती .
- लातुर जिल्हा बालविकास योजना ( नगर परिषद निलंगा / अहमदपुर , नगर पंचायत देवणी / जळकोट / शिरुर अनंतपाळ / रेणापुर ) प्रकल्प लातुर अंतर्गत मोठी पदभरती !
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !