महाराष्ट्र राज्याच्या महसूल व वन विभागामध्ये बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणारी तलाठी पदांसाठी मेगाभर्ती प्रक्रिया अखेर जाहीर करण्यात आलेली आहे .महसूल विभागाकडून तलाठी पदांच्या 4,625 जागेसाठी मेगाभर्ती बाबत प्रारूप जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .
पदनाम / पदसंख्या : यामध्ये तलाठी पदांच्या एकूण 4,625 जागांसाठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरिता दि.17 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहेत .यामुळे आता तलाठी पदांच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून मोठी खुशखबर समोर आलेली आहे .
पात्रता : सदर तलाठी पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तर सदर पदासाठी अर्ज करण्यासाठी खुल्या उमेदवाराचे वय दि.01 जानेवारी 2023 रोजी किमान 18 वर्षे तर कमाल 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे , तर मागासवर्गीय उमेदवारांकरीता किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 43 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .
वेतनमान : तलाठी पदांकरिता 7 व्या वेतन आयोगानुसार S – 8 वेतनश्रेणी मध्ये 25,500-81,100/- या वेतनश्रेणी मध्ये वेतन अधिक लागू असणारे वेतन + भत्ते अदा करण्यात येईल .
सदर पदभरती प्रक्रिया जाहिरातीमध्ये जिल्हानिहाय रिक्त पदांची संख्या , संवर्गनिहाय आरक्षण या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे .तसेच पैसा अंतर्गत भरती , पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्याकरिता आरक्षण सदर जाहिराती मध्ये नमूद करण्यात आलेले आहेत .
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !
- PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 407 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- BPCL : भारत पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- मीरा भाईंदर पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या एकुण 113 रिक्त जागेसाठी पदभरती .