महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये चालक / वाहक पदांच्या 14,250 जागांसाठी मेगाभरती राबविण्यात येतणार आहे . कोरोना महामारीनंतर राज्य शासनाच्या कोणत्याही विभागामध्ये मोठ्या प्रमाणात राबविण्यात आलेली नाही . शिवाय महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या बसेसच्या प्रवास सेवा कोरोना काळामध्ये बंदच होत्या , यामुळे महामंडळाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला होता . त्यानंतर बस महामंडळ कर्मचाऱ्यांना राज्य शासन सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा 5 महिने संप चालु होता . यामुळे महामंडळाच्या आर्थिक नुकसानामध्ये आणखीण वाढ झाली .
संपामध्ये अनेक कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात आली . अनेकांच्या सेवा समाप्तीचे आदेशही देण्यात आले यामुळे महामंडळामध्ये , रिक्त जागेची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे .सध्या महामंडळामध्ये 20,000 पेक्षा जास्तजागा रिक्त आहेत . यापैकी 14,250 जागांसाठी मेगाभरती राबविण्यात येणार आहे .यामध्ये प्रामुख्याने वाहक व चालक पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत . त्याचबरोबर लिपिक ,आगार प्रमुख , हमाल , वाहन निरिक्षक पदांचे जागा रिक्त आहेत .यामुळे बस महामंडळ कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे .यामुळे महामंडळ प्रशासनाकडुन रिक्त पदांवर पदभरती करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे . सदरची पदभरती प्रक्रिया माहे डिसेंबर 2022 पर्यंत पुर्ण करण्यात येणार आहे .
यामळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीची मोठी संधी मिळणार आहे .वाहक / चालक पदांबरोबर लिपिक पदांचे अनेक पदे रिक्त आहेत .महिला वाहक कर्मचाऱ्यांना लिपिक पदांवर पदोन्नती देवूनही सदरची पदे रिक्त आहेत .रिक्त पदांकरीता भरतीची जाहीरात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल .
- भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे मर्चंटस् सहकारी बँक लि. अंतर्गत अधिकारी , लिपिक , ऑपरेटर , अकौंट अधिकारी , शिपाई / चालक इ. पदांसाठी पदभरती !
- PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- अल्पसंख्याक दर्जा मान्यता प्राप्त शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षण सेवक , स्वयंपाकी , कामाठी पदावर नियमित वेतनश्रेणी पदभरती !
- Mahavitaran : महावितरण अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !