केंद्र सरकार योजना : ई – श्रम कार्डधारकांना प्रतिमहा मिळणार 3,000/- रुपये .

Spread the love

देशातील असंघटीत क्षेत्रामध्ये कार्यरत कामगार , सुशिक्षित कुशल कामगार यांचे आर्थिक आयुष्यमान उंचावण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडुन सन 2021 पासुन ई – श्रमकार्ड योजना लाँच करण्यात आली आहे .देशातील असंघटित क्षेत्रामध्ये कार्यरत कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सेवा मिळत नाही , त्याचबरोबर इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे 60 वर्षानंतर या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांकडे जीवन जगण्याचे कोणतेहे आर्थिक साधन नसल्याने , या कामगारांना खुप हालाखिचे दिवस काढावे लागते . यामुळे या कामगारांना वृद्धपकाळामध्ये सन्मानाने जिवन जगण्यासाठी प्रतिमहा पेन्शन लागु करण्याचा केंद्र सरकारने मोठा निर्णय घेता आहे .

      या अटल पेन्शन योजना अंतर्गत कामगारांना अत्यल्प प्रिमियम मध्ये महिना 3,000/- रुपये ते 5,000/- रुपये पेन्शनची प्रयोजन करण्यात आले आहे . यामुळे या असंघटीत कामगारांना सन्मानाने आयुष्य जगण्यास मदत होईल .या पेन्शन योजनेप्रमाणेच केंद्र सरकारकडुन देशातील असंघटित कामगारांसाठी ई-श्रम कार्ड योजना राबविण्यात आली आहे .या योजने अंतर्गत देशातील सर्व प्रकारच्या असंघटित श्रमिक वर्गामधील कामगार आवेदन करण्यास पात्र असणार आहेत .

ई-श्रम कार्डचे फायदे –

ई – श्रम कार्ड धारकांना देशातील नव्याने सुरु करण्यात आलेल्या प्रकल्पामध्ये कामाची संधी सर्व प्रथम उपलब्ध करुन देण्यात येते .त्याचबरोबर या योजना अंतर्गत कामाची मागणी करणाऱ्या कामगारांना काम उपलब्ध करुन देण्यात येते .6 महिन्याच्या आत काम न मिळाल्यास , अशा कामगारांना प्रतिमहा 3,000/- रुपये पेन्शन दिली जाते .

ई -श्रम कार्डसाठी नोंदणी कसे करायचे ?

ई- श्रम कार्डचा लाभ घेण्यासाठी https://eshram.gov.in/  संकेतस्थळावर जावून ऑनलाईन पद्धतीने आवेदन करु शकता . ई – श्रम कार्डचा फायदा घेवू शकता .

Leave a Comment