स्टाफ सिलेक्शन कमिशन (कर्मचारी निवड आयोग) मार्फत विविध पदांच्या तब्बल 1,324 जागेसाठी मोठी भरती प्रक्रिया राबवली जात असून , शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विविध कालावधी आवेदन मागवण्यात येत आहेत . (staff Selection commission New Recruitment , Number Of Vacancy – 1,324 ) पदांची संख्या, पदनाम शैक्षणिक पात्रता या संदर्भातील सविस्तर मेगा भरती जाहिरात पुढील प्रमाणे पाहूयात …
पदनाम / पदसंख्या : यामध्ये कनिष्ठ अभियंता ( सिव्हील ) , कनिष्ठ अभियंता ( मेकॅनिकल) , कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) , कनिष्ठ अभियंता ( इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल ) अशा एकूण 1324 जागेसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबवली जात आहे . ( Junior Engineer Civil/ Mechanical/Electrical/Electrical & Mechnical )
शैक्षणिक पात्रता : वरील सर्व पदाकरिता पदानुसार उमेदवार हे स्थापत्य / यांत्रिकी / इलेक्ट्रिकल या ट्रेडमध्ये अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे ..
वयोमर्यादा : सदर पदाकरिता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01 जानेवारी 2023 रोजी वय 30/32 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहे . यामध्ये अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्ष तर इतर मागासवर्गीय उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्षाची अतिरिक्त सूट देण्यात येणार आहे ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज https://ssc.nic.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 16 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करिता 100/- रुपये तर मागासवर्गीय / माजी सैनिक / महिला प्रवर्गातील उमेदवारांकरिता कोणतीही आवेदन / शुल्क परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- NIACL : न्यु इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. अंतर्गत 550 रिक्त जागेसाठी महाभरती .
- सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक ( कनिष्ठ सहाय्यक ) पदांच्या एकुण 444 रिक्त जागेसाठी महाभरती .
- MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत गट क पदांच्या एकुण 2619 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- Mazagaon Dock : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 495 रिक्त जागेसाठी महाभरती .
- पवन हंस लिमिटेड अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2026