महाराष्ट्र डाक सर्कल मध्ये ग्रामीण डाकसेवक पदांच्या तब्बल 3154 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Post Office Circle Recruitment , Number of Post Vacancy – 3154 ) पदनाम / पदांची संख्या , आवश्यक पात्रता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम : ब्रांच पोस्ट मास्टर ( BPM ) व सहाय्यक ब्रांच पोस्ट मास्टर ( ABPM ) – ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या एकुण 3154 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
पात्रता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच संगणकाचे मुलभुत प्रशिक्षण कोर्स – MSCIT / CCC प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय हे दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी किमान 18 वय तर कमाल वय 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे .यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये पाच तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : भारतीय डाक विभागांमध्ये तब्बल 30,041 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://majhinaukri.in/india-post-recruitment/ या संकेतस्थळावर दिनांक 23 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरतीसाठी जनरल / इतर मागास प्रवर्ग व आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर SC/ST/PWD /महिला प्रवर्गातील उमेदवारांकरीता कोणतीही परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026