महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत विविध गट क संवर्गातील पदांच्या तब्बल 18,939 जागांसाठी अखेर अधिकृत्त पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . सदरची पदे ही सरळसेवा पद्धतीने आयबीपीएस कंपनीमार्फत भरण्यात येत असून , सदर पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत .
पदांचे नावे : ग्रामसेवक , औषध निर्माण अधिकारी , आरोग्य सेवक पुरुष , आरोग्य सेवक ( महिला ) , आरोग्य सेवक ( पुरुष ) फवारणी कर्मचारी , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ,कनिष्ठ अभियंता – स्थापत्य , शिक्षण सेवक , पशुधन पर्यवेक्षक , परिचर , विस्तार अधिकारी – सांखिकी , वरिष्ठ लेखा सहाय्यक – वित्त विभाग , कनिष्ठ सहाय्यक लेखा – वाहनचालक , अंगणवाडी अधिक्षक , पदवीधर शिक्षक
अशा गट क संवर्गातील तब्बल 18,939 पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी आवश्यक पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत . रिक्त पदांची संख्या जिल्हा निहाय प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे आयबीपीएस कंपनीच्या जिल्हा परिषद संकेतस्थळावर दिनांक 05 ऑगस्ट 2023 पासून ते दिनांक 25 ऑगस्ट 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
परीक्षा शुल्क : सदर पदभरती प्रक्रिया करीता खुलाा प्रवर्ग मधील उमेदवारांकरीता 1000/-रुपये तर मागास प्रवर्ग / अनाथ प्रवर्ग करीता 900/- आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहे तर माजी सैनिक व दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांकरीता कोणतीही परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीकरीता / ऑनलाईन पद्धतीन आवेदन सादर करण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहावी ..
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026