महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गातील तब्बल 18,939 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारकांनी विहीत कालावधीत दिनांक 05 ऑगस्ट पासून ऑनलाईन अर्ज करायचे आहेत . जिल्हानिहाय रिक्त पदांची संख्या व पदभरती जाहीरात , आवश्यक पात्रता अर्ज प्रक्रिया बाबत सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
जिल्हा परिषद मधील 18,939 महाभरती पैकी सध्या एकुण 12 जिल्हा प्रशासनांकडून रिक्त पदांची आकडेवारी प्रसिद्ध केली असून , आवेदन प्रक्रियास सुरुवात केली आहे . सदर उर्वरित सर्व जिल्हा परिषदांकडून उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व रिक्त पदांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात येणार असून ऑनलाईन पद्धतीने प्रक्रियेस सुरुवात करण्यात येणार आहेत .
यांमध्ये अमरावती जिल्हा परिषदेमध्ये एकूण 653 जागा , गोंदिया जिल्हा परिषदेंमध्ये 339 पदे , वाशिम जिल्हा परिषदेमध्ये 242 पदे , नाशिक जिल्हा परिषदेमध्ये 1038 पदे , नांदेड जिल्हा परिषदेमध्ये 628 पदे , रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये 715 जागा , अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये 937 जागा , जळगाव जिल्हा परिषदेमध्ये 626 जागा , तर हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये 204 जागा व नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये 475 जागांवर पदभरती बाबत सध्या जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : गट ब आणि गट क संवर्गातील तब्बल 1207 जागेसाठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारकांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या वेबसाईटवर दिनांक 05 ऑगस्ट पासून दिनांक 25 ऑगस्ट 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
जिल्हानिहाय जिल्हा मधील गट क संवर्गातील रिक्त पदांची संख्या व पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहु शकता …
- गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी लातुर अतंर्गत विविध पदांसाठी पदभरती ..
- SBI : भारतीय स्टेट बँकेत तब्बल 821 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- आखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद पुणे अंतर्गत अधिकारी , अधिक्षक , लेखापाल , टर्नर शिपाई इ . पदांसाठी पदभरती .
- राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण तथा भुमि उपयोग नियोजन ब्युरो नागपुर अंतर्गत सहाय्यक , कनिष्ठ / वरिष्ठ लिपिक पदांसाठी पदभरती …
- श्रीयश प्रतिष्ठान छ.संभाजीनगर अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा तंत्रज्ञ / सहाय्यक , कामगार इ . पदांसाठी पदभरती ..